Loading...
Image
Image
View Back Cover

विकासाच्या अभ्यासाची तोंडओळख

 • बी. के. पटनाईक - प्राध्यापक, स्कूल ऑफ एक्स्टेन्शन अँड डेव्हलपमेंट स्टडीज, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), नवी दिल्ली

विकास अभ्यासाची तोंडओळख हे पुस्तक विकासाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमींचा एकत्रित व समतोल आढावा घेते. सैद्धान्तिक आणि प्रायोगिक आयामांचे विश्लेषण करते. विकास म्हणजे निव्वळ आर्थिक वृद्धी नव्हे, हे वास्तव लेखक अनेक विकसनशील देशांमधील विद्यमान आणि गतकाळातील उदाहरणे मांडून सप्रमाण दाखवून देतो. बहुवैषयिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना विकास अभ्यासाची मूलतत्त्वे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. विकास सिद्धान्त, निदर्शक रूपावली (पॅराडाइम) आणि विकास प्रक्रियेतील घटकांपासून सुरुवात करत, हे पुस्तक विकासाभिमुख शासन, व्यवस्थापन, संज्ञापन आणि नियोजनाविषयी विवेचन करते. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, लोकनीती आणि सामाजिक शास्त्रांच्या विद्यार्थ्यांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरेल.

सैद्धान्तिक आणि व्यवहार्य दृष्टिकोनातून विकास या संकल्पनेची सखोल चिकित्सा, विद्यमान विकास संकल्पनेतील तीन महत्त्वाच्या पैलूंचा सर्वंकष आढावा – विकासाभिमुख शासन, विकासाभिमुख प्रशासन आणि विकासाभिमुख संज्ञापन, सुलभ सादरीकरण आणि विवेचन असे या पुस्तकाचे विविध पैलू आहेत.

 • प्रस्तावना
 • विकासाची तोंडओळख
 • विकासाचे अभिजात आणि नवअभिजात सिद्धान्त
 • विकासाचे विकासात्मक सिद्धान्त
 • विकासाचे आधुनिक सिद्धान्त
 • विकासाचे आयाम
 • बाजारपेठ, शासन आणि विविध कर्ते
 • विकासाची रूपरेषा
 • विकास प्रशासन
 • विकासाचे अभिशासन
 • विकासाचे नियोजन
 • विकास व्यवस्थापन
 • विकास संपर्क
 • शब्दार्थसूची
बी. के. पटनाईक

बी. के. पटनाईक यांनी विश्लेषणात्मक व उपयोजित अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, मानव संसाधन व्यवस्थापनात एम.ए. आणि अर्थशास्त्रात वाचस्पती (पीएच.डी.) मिळवली आहे. त्यांच्या गाठीशी संशोधन आणि अध्यापनाच्या विविध राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमधील २५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली; राष्ट ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in