Loading...
Image
Image
View Back Cover

यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये

 • अलका वाडकर - माजी अध्यापक, मानसशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ

अतिशय वेगळ्या आणि ताज्या अॅप्रोचने लिहिलेले हे पुस्तक वाचकांना दैनंदिन आव्हानांचा दाखला देत त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्ये सुधारण्याकामी मदत करते.

यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये मानसशास्त्रातील मूलभूत तत्त्वांच्या आधारे वाचकांना ताण, तंदुरुस्ती, कामकाज, खासगी नाती, संवाद, खंबीरपणा आणि आत्मसन्मान अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी माहिती आणि मदत पुरवते. सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे लिहिले गेले आहे आणि या गरजांचे स्वरूप, कारणे आणि परिणाम समजून घेऊन त्यांना जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर सखोल ज्ञान प्राप्त करण्यास मदत करेल.

एक अप्रतिम साधन असलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना परस्पर संवादकौशल्य, सामाजिक देवघेव आणि स्वयंनियोजन सुधारण्यासही मदत करेल, ज्यातून त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर यश मिळू शकेल.

हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्राचे सिद्धान्त, संशोधन आणि उपयोजनांचे सुलभ भाषेत मांडलेले एक वेगळे आणि गहनपणे मांडलेले सादरीकरण आहे. हे पुस्तक चार विभागांमध्ये विभागलेले आहे.

 • प्रस्तावना
 • ऋणनिर्देश

भाग १: आत्मभान

 • आत्मप्रतिष्ठा
 • प्रेरणा
 • सर्जनशीलता
 • मूल्येव नैतिकता
 • स्वचे व्यवस्थापन

भाग 2: संप्रेषण आणि विचारप्रक्रिया

 • संप्रेषण
 • विचारप्रक्रिया आणि तर्कप्रक्रिया
 • अंतःस्फूर्त विचारप्रक्रिया
 • सकारात्मक विचारप्रक्रिया
 • निर्भीडपणा
 • तर्कदोष, गैरसमजुती आणि विरोधाभास

भाग 3: भावना

 • भावना
 • भावनिक बुद्धिमत्ता
 • प्रेम आणि सुख
 • राग आणि भीती
 • ताण

भाग 4: इतरांशी असलेले भावनिक बंध

 • तदनुभूति
 • मैत्री
 • नेतृत्व
 • आंतरक्रियात्मक विश्लेषण, पहिली छाप आणि सादरीकरणाची कौशल्ये
 • संघबांधणी
 • आंतरव्यक्तिक परस्परसंबंध
 • संदर्भ ग्रंथसूची
अलका वाडकर

अलका वाडकर यांची संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उज्ज्वल होती. त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पीएच. डी. शिक्षण पूर्ण केले असून अनेक पुरस्कार आणि शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या आहेत. अध्यापन, संशोधन आणि सामाजिक कार्यातील समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात साधारण ३० वर्षे मानसशास् ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in