Loading...
Image
Image
View Back Cover

जागतिकीकरणातील लोकप्रशासन

सिद्धांत आणि व्यवहार

 • बिद्युत चक्रवर्ती - प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दिल्ली विद्यापीठ
 • प्रकाश चंद - सहायक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दयाल सिंह (ई) महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोकप्रशासनाच्या क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा सारांशात्मक आढावा ‘जागतिकीकरणातील लोकप्रशासन’ हे पुस्तक घेते. शासन पद्धती समजून घेण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या पैलूंचा घेतलेला मागोवा हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. हे करत असतानाच, जगभरात एकूणच समाज आणि प्रशासन प्रणालींमध्ये होत असलेल्या संक्रमणाची दखलही हे पुस्तक घेते. 

यात पुढील काही विषयांचा अभ्यास आहेः

• लोकप्रशासन या विषयाची उत्क्रांती

• प्रशासन सिद्धान्त

• लोकप्रशासनातील ताज्या घडामोडी 

• लोकनीती

• विकास प्रशासन

• विकेंद्रीकरण आणि स्थानिक प्रशासन

• समाजकल्याण आणि प्रशासन 

• भारतातील लोकप्रशासन 

• नागरिक आणि प्रशासन

• भारतीय अर्थसंकल्प आणि वित्तीय प्रशासन

• भारतातील प्रशासकीय सुधारणा

• जागतिकीकरण आणि लोकप्रशासन

पाठ्यपुस्तकाच्या शैलीत लिहिले गेलेले हे पुस्तक, प्रत्येक प्रकरणाशी संबंधित प्रश्नसंचांमुळे, या विषयाच्या पदवीपूर्व आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय विविध मुलकी सेवा परीक्षार्थी आणि यूजीसी-नेट परीक्षार्थींनाही त्याचा लाभ होईल.

 • प्रस्तावना
 • विषयप्रवेश
 • लोकप्रशासनः ज्ञानशाखा म्हणून उत्क्रांती व विकास
 • प्रशासकीय सिद्धान्त
 • लोकप्रशासनातील नवे विचारप्रवाह
 • सार्वजनिक धोरण
 • विकास प्रशासन
 • विकेंद्रीकरण आणि स्थानिक अभिशासन
 • समाजकल्याण प्रशासन
 • नागरिक आणि प्रशासन
 • भारतामधील लोकप्रशासन
 • भारतातील अर्थसंकल्प आणि वित्तीय प्रशासन
 • भारतातील प्रशासकीय सुधारणा
 • जागतिकीकरण आणि लोकप्रशासन
 • उपसंहार
 • नमुना प्रश्न
बिद्युत चक्रवर्ती

बिद्युत चक्रवर्ती हे सध्या भारतातील दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते दिल्ली विद्यापीठातील सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), कोलकाता; मोनाश युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया; नॅशन ... अधिक वाचा

प्रकाश चंद

प्रकाश चंद हे सध्या भारतातील दिल्ली विद्यापीठाच्या अखत्यारितील दयाळ सिंग (ई) महाविद्यालयात राज्यशास्त्राचे अध्यापक आहेत. इंडियन सोशल सायन्स रिव्ह्यू, गांधी मार्ग, इंडियन जर्नल ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि अर्बन इंडिया अॅण्ड सोशल चेंज या संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. लोकप्रशासन आणि भारतातील पर्यावरणीय अभिशासन ही त्यां ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in