Login


वस्त्राद्वारे स्वातंत्र्यप्राप्ती
गांधीप्रणीत स्वदेशी क्रांतीमधील आवाहनाची मीमांसा
1
महात्मा गांधी यांनी स्वदेशी पेहरावाच्या वापराच्या प्रभावी संदेशातून ३० कोटी भारतीय ज्यात सहभागी झाले अशी अभूतपूर्व क्रांती कशी घडवली याचा शोध प्रस्तुत ग्रंथातून घेण्यात आला आहे.
गांधींच्या प्रभावी संवादशैलीच्या संदर्भातून प्रस्तुत ग्रंथाचा अभ्यास मांडलेला आहे. रोलां बार्थ ,व्हिक्टर टर्नर ,आणि एरवींग गॉफमन यांच्या सिद्धांताच्या वापरातून लेखकाने गांधींच्या संवादात्मक पद्धतीचे सखोल विश्लेषण केले आहे. या विश्लेषणामुळे स्वदेशी वस्त्रांच्या वापरातून दास्यमुक्ती मिळवण्याच्या गांधींच्या वैशिष्ट्यपूर्ण धोरणावर प्रकाश टाकला आहे.वस्त्रांच्या वैयक्तिक व सामाजिक वापरातून स्वदेशीचे 'सामाजिक रूपक' जनमानसांत कसे रुजत गेले याच बरोबर ३० वर्षे दीर्घ सुरू असलेल्या या स्वातंत्र्य संग्रामात गांधी हे निर्विवादपणे 'राष्ट्राच्या वाटचालीचे व्यवस्थापक' कसे होते हे ही आपल्यास समजते.
सामाजिक -राजकीय बदलांसाठी प्रतीकांच्या निर्मितीकडे पाहण्याच्या गांधींच्या दृष्टीकोनाची सखोल मांडणी करून या लेखनाची सांगता होते. प्रस्तुत ग्रंथ संवाद, राज्यशास्त्र, इतिहास , चिन्ह शास्त्र, संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय बोधपूर्ण व उपयुक्त स्रोत ठरेल यात शंकाच नाही.
- केवल जे. कुमार यांची प्रस्तावना
- गांधी संवादशैलीचा विकास
- बार्थः गांधीप्रणीत वस्त्रभूषेची व्यवस्था
- संदर्भ ग्रंथसूची
- टर्नरः गांधींच्या स्वदेशी क्रांतीमधील सामाजिक रूपक
- गॉफमन: गांधी - राष्ट्राच्या वाटचालीचे व्यवस्थापक
- गांधींचा प्रतीकात्मतेप्रती असलेला दृष्टिकोन
- छायाचित्रे आणि चित्रे
- परिशिष्ट
पीटर गोंसाल्विस
पीटर गोंसाल्विस, पीएच.डी., हे सध्या सेलेसिअन पॉण्टिफिकल युनिव्हर्सिटी, रोम येथे संप्रेषण शास्त्रांचे अध्यापन करतात. त्यांनी अहमदनगर येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात ग्रामीण विकास समुदाय कार्यकर्ता म्हणून आपल्या माध्यमातील कारकिर्दीची सुरुवात केली. दक्षिण आशियामध्ये जीवनाधारित शिक्षणविषयक जनजागृती व्हावी याकरता तेज-प्रसारिणी, मुंबई, या बहुमाध्यम ... अधिक वाचा
PURCHASING OPTIONS
write to customerservicebooks@sagepub.in