Loading...
Image
Image
View Back Cover

गांधी आणि अली बंधू

एका मैत्रीची चरित्र

  • राखहरि चटर्जी - राज्यशास्त्रातील यु.जी.सी मानद सदस्य, कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता

हे पुस्तक म्हणजे १९१९ ते १९३१ या दरम्यान गांधी व अली बंधू यांच्यातील नात्याचा असहकार आणि खिलाफत चळवळींच्या संदर्भातून घेतलेला परामर्श आहे. गांधींचा खिलाफत आंदोलनातील सहभाग हा एका मुस्लीम प्रश्नाचे राष्ट्रीय प्रश्नात रूपांतर करण्याच्या उपक्रमातील पहिलाच थेट सहभाग होता. आपल्या समुदायाच्या कोशातून मुस्लिमांना बाहेर काढून भारताच्या राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गांधींनी स्वीकारलेला हा मार्ग होता; पण अली बंधूंसोबतचे नाते तुटल्यामुळे हा त्यांचा शेवटचा उपक्रम ठरला आणि मुस्लिमांच्या सहभागाचा प्रश्न फाळणीपर्यंत सोडवलाच गेला नाही.

गांधी आणि अली बंधू यांच्यातील नाते कसे आकारस आले, त्यातील संघर्ष आणि ते नाते कशा प्रकारे विखुरले गेले याचे कथन करताना सूक्ष्म नात्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकातून केला गेला आहे. हिंदू-मुस्लीम संवादाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक भारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या क्षणी राजकीय पटलावर असणाऱ्या तीन अटळ कारकांमधील वैशिष्ट्यपूर्ण मैत्रीचे हे वर्णन आहे.

  • प्रस्तावना
  • समारोप: बहुसंस्कृतिवाद-वेळेआधीच उदयास आलेला
  • ‘प्रथमदर्श नी प्रेम'
  • सिद्धान्त: समुदायवाद, बहुसंस्कृतिवाद आणि गांधी
  • मावळतीकडे
  • अली बंधू: व्यक्तिचित्रे
  • संकटात सापडलेली युती
  • इतिहास
  • अखेरचे वळण
राखहरि चटर्जी

राखहरि चटर्जी (पीएच.डी., शिकागो) हे कलकत्ता विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि कला विभागाचे अधिष्ठाता होते. ते शिकागो विद्यापीठामध्ये फुलब्राईट स्कॉलर (१९७०–७१), सोशल सायन्स रिसर्च काऊन्सिल फेलो (१९७३–७५) आणि फुलब्राईट पोस्ट-डॉक्टरल व्हिजिटिंग फेलो (१९८६–८७) होते. तसेच ते अँन आर्बर येथील मिशिगन विद्यापीठामध्ये फोर्ड फाऊंडेशन व्हिजि ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in