Loading...
Image
Image
View Back Cover

भारतीय प्रशासन

उत्क्रांती आणि व्यवहार

 • बिद्युत चक्रवर्ती - प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दिल्ली विद्यापीठ
 • प्रकाश चंद - सहायक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दयाल सिंह (ई) महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ

विविध सैद्धान्तिक आणि व्यावहारिक बाबींचे संदर्भासहित विश्लेषण करून हे पुस्तक वाचकांना भारतीय प्रशासनाच्या उत्क्रांतीचा परिचय करून देते.

भारतीय प्रशासन : उत्क्रांती आणि व्यवहार  स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारतीय लोकप्रशासनाच्या वृद्धी आणि विकासाचा परामर्श या क्षेत्रातील नवीन मुद्दे आणि आव्हानांचे सखोल विश्लेषण करते. केवळ भारतीय प्रशासन व्यवस्थेतील संस्थात्मक वैशिष्ट्यांवर भर न देता, हे पुस्तक महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून वेध घेते. त्यामुळे वाचकांना अभ्यास आणि व्यवहाराच्या क्षेत्रातील वैचारिक आणि सैद्धान्तिक व्यामिश्रता जाणून घेण्यास मदत होईल.

ठळक वैशिष्ट्ये

 • भारतीय प्रशासनातील पारंपरिक आणि नवीन मुद्द्यांचा सखोल आणि बहुआयामी पद्धतीने परामर्श घेते
 • प्रशासनातील प्रक्रियांचा संबंधित घटनात्मक तरतुदी तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भांसह मागोवा घेते
 • भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतील नवीन आव्हाने आणि आगामी मुद्द्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरवते
 • भारतीय विद्यापीठांतील विद्यार्थी आणि राज्य व केंद्रीय मुलकी सेवा इच्छुकांसाठी उपयुक्त अभ्यास

 • प्रस्तावना
 • भाग २ - अनुभवसिद्ध आयाम
 • भारतातील वित्तीय व्यवस्थापन
 • भारतातील सार्वजनिक धोरण
 • भारतातील नियोजन आणि आर्थिक विकास
 • भारतातील प्रशासकीय सुधारणा
 • भारतातील समाजकल्याण प्रशासन
 • भारतातील स्थानिक अभिशासन: ग्रामीण व शहरी
 • भाग १ - संकल्पनात्मक आयाम
 • प्रशासनातील प्रमुख आयाम
 • केंद्रीय प्रशासनाची संरचना
 • भारतातील पर्यावरण प्रशासन भारतीय
 • भारतातील नागरिक आणि प्रशासन
 • उपसंहार
 • भारतातील नागरी सेवा
 • भारतीय प्रशासनाचा क्रमविकास
 • विषयप्रवेश
 • जिल्हा प्रशासन
 • राज्य प्रशासन
 • भारतीय प्रशासनाची तात्त्विक व घटनात्मक चौकट
बिद्युत चक्रवर्ती

बिद्युत चक्रवर्ती हे सध्या भारतातील दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते दिल्ली विद्यापीठातील सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), कोलकाता; मोनाश युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया; नॅशन ... अधिक वाचा

प्रकाश चंद

प्रकाश चंद हे सध्या भारतातील दिल्ली विद्यापीठाच्या अखत्यारितील दयाळ सिंग (ई) महाविद्यालयात राज्यशास्त्राचे अध्यापक आहेत. इंडियन सोशल सायन्स रिव्ह्यू, गांधी मार्ग, इंडियन जर्नल ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि अर्बन इंडिया अॅण्ड सोशल चेंज या संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. लोकप्रशासन आणि भारतातील पर्यावरणीय अभिशासन ही त्यां ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in