Loading...
Image
Image
View Back Cover

भारतीय अर्थव्यवस्थेची संक्रमणावस्था

सी.टी. कुरियन यांच्या सन्मानार्थ निबंध

 • एस. जनकराजन - प्राध्यापक सल्लागार, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज (एमआयडीएस)
 • एल. वेंकटाचलम - प्राध्यापक, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, चेन्नई, भारत
 • आर. मरिय सलेथ - संचालक, लॉयोला इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन (लिबा)

भारताच्या आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेचे सुयोग्यरीत्या दस्तऐवजीकरण झालेले असले तरीही सर्वसामान्य आणि क्षेत्रीय संदर्भातून संक्रमणावस्थेदरम्यान आणि नंतर निर्माण झालेल्या समस्या आणि परिणाम हे धोरणकर्त्यांसाठी प्रमुख चिंतेचे विषय ठरलेले आहेत. सी.टी. कुरियन यांच्या सन्मानार्थ प्रकाशित केलेला हा खंड भारताच्या गेल्या दीड दशकातील वृद्धीच्या कामगिरीचे आणि परिणामांचे गुणवत्तापूर्ण मूल्यांकन करतो.

भारताच्या आर्थिक विकासाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे परीक्षण करताना हा खंड अन्नधान्याची भाव वाढ, कृषी क्षेत्राची कामगिरी, मजूर बाजारपेठ, सामाजिक पायाभूत सुविधा, हवामानातील बदल, शासन, दारिद्र्य आणि विषमता अशा गंभीर समस्यांना वाचा फोडतो. तसेच आर्थिक वृद्धीचा समाज आणि पर्यावरणसंस्थेवरील परस्पर प्रभाव दर्शवितो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अन्न आणि मजूर असुरक्षितता, भ्रष्टाचार, प्रशासनातील दरी, जातीय भेदभाव आणि पर्यावरणाचा ढासळणारा दर्जा या वाढत्या समस्यांवर प्रकाश टाकत भारतीय लोकशाहीस महत्त्वाची आव्हाने ठरलेलया समस्यांवर राष्ट्रीय आणि क्षेत्रीय संदर्भातून धोरणात्मक बदल आणि शासकीय सुधारणा सुचवतो.

 • प्रस्तावना
 • ऋणनिर्देश
 • भारतीय अर्थव्यवस्थेची संक्रमणावस्था: समस्यांचे संदर्भ आणि विहंगावलोकन
 • जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था: समस्या आणि चिंता
 • अन्नाच्या किमतीतील चलनवाढ आणि सार्वजनिक खरेदी: भारतीय अनुभव
 • सुधारणांतर्गत शेतीतील बदल: तमिळनाडूची केस स्टडी, १९८०–२००५
 • भारतातील शेतकऱ्यांना शेती फायदेशीर आहे का? लागवड खर्च सर्वेक्षण माहितीमधील पुरावा
 • भारतातील ‘सर्वांसाठी शिक्षण’: समस्या, धोरण आणि अनिवार्यता
 • ‘ग्रामीण दारिद्र्य: धोरण आणि ढोंग’ पुनर्विचार. भारतीय राज्ये दारिद्र्यनिर्मूलनामध्ये चांगली कामगिरी का करू शकत नाहीत?
 • भारतातील सामाजिक भेदभाव - आर्थिक नागरिकत्वाची केस स्टडी
 • सहस्त्रक विकासाची ध्येये: भारताची कामगिरी
 • भारतातील उदयोन्मुख वृद्धत्वाचा आढावा २००१–५१
 • भारतामधील घरगुती पातळीवरचे प्रदूषण: संरचना आणि प्रक्षेपणे*
 • भारतातील पर्यावरण व्यवस्थापनासाठी आर्थिक साधनांची रचना आणि सहभागी संस्था
 • शहरांमधील पाण्याच्या वाढत्या मागणीचे चेन्नईच्या निमशहरी भागांतील उदरनिर्वाहाच्या लवचीकतेवरील परिणाम
 • भारतातील पाण्याच्या वाटपासाठी बाजारपेठ-आधारित संस्थात्मक बदल: समस्या आणि आगामी वाटचाल
 • ग्रामीण भारतातील श्रमिक बाजारपेठेतील असुरक्षिततेचे मापन करणे: लिंगभाव आधारित विश्लेषण
एस. जनकराजन

एस.जनकराजन हे सध्या साउथ एशिया कॉन्सॉर्टियम फॉर इंटरडिसिप्लिनरी वॉटर रिसोर्सेस स्टडीज, हैदराबाद चे अध्यक्ष आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या क्वीन एलिझाबेथ हाउसमध्ये त्यांनी व्हीजिटिंग प्राध्यापक म्हणून काम पाहिले. पाणी, पर्यावरण आणि हवामानातील बदलांमधील ते विशेष तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत/सह-लेखक म्हणून काम केले आहे/संपादित केली ... अधिक वाचा

एल. वेंकटाचलम

एमआयडीएस, चेन्नई येथे प्राध्यापक आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोडे आणि अमृतसर, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एमएसई) आणि इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी, चेन्नई येथे व्हीजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत होते. बाजारेतर मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करून ते पर्यावरणविषयक धोरण आणि हवामानातील बदलांबाबत पर् ... अधिक वाचा

आर. मरिय सलेथ

आर. मरिय सलेथ हे सध्या मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे मानद प्राध्यापक असून लॉयोला इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन (लिबा) आणि (एमआयडीएस), चेन्नई चे माजी संचालक होते. त्यांनी पूर्वी कोलंबोच्या इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट; इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, दिल्ली; आणि इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज, बेंगळुरू साठी काम केल ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in