Loading...
Image
Image
View Back Cover

खादी

गांधींच्या क्रांतीचे महाप्रतीक

वस्त्राद्वारे एकता, सक्षमीकरण आणि दास्यमुक्ती या रूपकांच्या अभ्यासाच्या माध्यमातून एका प्रतीकाची संपूर्ण समाजात गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद याचा शोध खादी, गांधींच्या क्रांतीचे महाप्रतीक हे पुस्तक घेते.

गांधींनी पोषाखाच्या चिन्हविज्ञानातून वैयक्तिक एकात्मता आणि सामाजिक-राजकीय परिवर्तन साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे ऐतिहासिक पुरावे प्रस्तुत पुस्तक देते. बहुआयामी परिप्रेक्ष्यातून हे पुस्तक अतिशय बारकाईने पेहरावाच्या संवादशैलीत दडलेले साम्राज्यसत्तेच्या उलथापालथीचे परीक्षण करते.

ब्रिटीश साम्राज्य आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील संघर्ष, हिंदू -मुस्लीम तणाव, शहरी- ग्रामीण विभाजन आणि अस्पृश्यता प्रश्न अशा अगदी विरुद्ध प्रकारच्या वातावरणात गांधींसमोर आलेल्या जटिल आव्हानांची चर्चासुद्धा लेखकाने प्रस्तुत पुस्तकात केली आहे.

सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रतीकात्मक सामर्थ्याचे परीक्षण करताना लेखक, खादी केवळ 'क्रांती' किंवा 'राजद्रोह' अशी मर्यादित नसून पूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्ण स्वराज्य प्राप्त करण्यासाठीचे एक चिरस्थायी व सुसंघटित धोरण आहे असे प्रतिपादित करतात.

हे  स्पष्टीकरणात्मक पुस्तक दक्षिण आशियाई संशोधनाच्या विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि विद्वानांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

 

 

 

 • प्रस्तावना
 • भाग अ: आत्मक्रांती
 • ‘इंग्लिश जंटलमन’ बनण्याची उत्कट इच्छा (१८६९-९१)
 • वस्त्रमहिमा: एक शोध(१८९२-१९१३)
 • महात्म्याचे 'प्रकटीकरण' (१९१४-१९४८)
 • भाग ब: आर्थिक आणि राजकीय क्रांती
 • भारताची लूटमार
 • गांधींची आर्थिक-राजकीय उलथापालथ
 • वादंग
 • भाग क: मानसिक-सांस्कृतिक क्रांती लोकांचे गौणीकरण
 • गांधींची मानसिक-सांस्कृतिक क्रांती
 • वादंग
 • भाग ड: सामाजिक आणि धार्मिक क्रांती- अस्पृश्यता
 • भारतासाठी शरमेची गोष्ट
 • गांधींची सामाजिक-धार्मिक क्रांती- अस्पृश्यता
 • वादंग
 • भाग इ:सामाजिक आणि धार्मिक क्रांती - दहशतवाद
 • भारताची दुफळी
 • गांधींची सामाजिक-धार्मिक क्रांती – दहशतवाद
 • वादंग
 • भाग फ: खादीच्या माध्यमातून गांधींच्या क्रांतीची तत्त्वमीमांसा
 • गांधींनी केलेल्या क्रांतीची पायाभूत तत्त्वे खादीची तत्त्व-मीमांसा
 • निष्कर्ष
पीटर गोंसाल्विस

पीटर गोंसाल्विस, पीएच.डी., हे सध्या सेलेसिअन पॉण्टिफिकल युनिव्हर्सिटी, रोम येथे संप्रेषण शास्त्रांचे अध्यापन करतात. त्यांनी अहमदनगर येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात ग्रामीण विकास समुदाय कार्यकर्ता म्हणून आपल्या माध्यमातील कारकिर्दीची सुरुवात केली. दक्षिण आशियामध्ये जीवनाधारित शिक्षणविषयक जनजागृती व्हावी याकरता तेज-प्रसारिणी, मुंबई, या बहुमाध्यम ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in