Loading...
Image
Image
View Back Cover

जागतिक जिहाद आणि अमेरिका

इराक आणि अफगाणिस्तान पलीकडील शंभर वर्षांचे युद्ध

  • ताज हाश्मी - सिक्युरिटी स्टडीजचे प्राध्यापक, ऑस्टिन पे स्टेट युनिव्हर्सिटी, टेनेसी, यूएसए

इस्लामिक दहशतवाद किंवा जागतिक जिहाद पौर्वात्य आणि पाश्चिमात्य आधुनिक मानवी संस्कृतीसमोरील सर्वांत मोठा धोका आहे, या गृहितकावर हा अभ्यास प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. पाश्चिमात्य आणि इस्लामिक संस्कृती परस्परांशी विसंगत आहेत आणि त्या अनिश्चित काळापर्यंत एकमेकांशी झुंजत राहणार, हेच दैवाने लिहिले असेल, तर तो एका वेगळ्या संशोधनाचा विषय आहे असा दृष्टिकोन हे पुस्तक बाळगते. परिणामी हे पुस्तक असा युक्तिवाद करते की तिसऱ्या  जगातील देशांना सरकारपुरस्कृत दहशतवाद आणि छुप्या युद्धांपासून –‘गैरसरकारी (नॉन स्टेट) कारकांच्या’च्या दहशतवादापासून नव्हे – सर्वांत मोठा धोका आहे.

अंतिमतः जगाचे भवितव्य कड्याच्या एका टोकाला पोहोचले आहे आणि परतीचे दोर कापलेले आहेत,असे हा अभ्यास सुचवत नाही. हा महाप्रलय टाळण्यासाठी अमेरिका आणि मुस्लीम  देश दोघेही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दरम्यान, गरिबांची गरज आणि श्रीमंत व सत्ताधीशांची हाव यांच्यातील दरी वाढत आहे. इतिहासामध्ये पाहिले असता, शांतता व न्याय, धर्म आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली श्रीमंत आणि सत्ताधीशांनीच युद्ध आणि विध्वंस करत मानवी संस्कृतीसमोर मोठी अरिष्टे आणली आहेत. या पार्श्वभूमीवर, आज समोर ठाकलेला प्रश्न आहेः अमेरिका व तिच्या मित्र देशांनी ‘वॉर ऑन टेरर’ ही घोषणा केलेली असताना आणि त्यांचे मुस्लीम  शत्रू प्रतिष्ठा आणि धर्माचे संरक्षण करत असल्याचे प्रतिपादन करत असताना,आपण हा विध्वंस रोखू शकणार आहोत का?

  • प्रस्तावना आणि ऋणनिर्देश
  • परिचय
  • इस्लाम आणि इस्लामवादातील प्रवाह: अल्लाचा कायदा विरुद्ध मुल्लांचा कायदा
  • जागतिक मुस्लिमांसमोरील तिहेरी संकट : इस्लामचा भयगंड, इस्रायल आणि जागतिकीकरण
  • अमेरिकेचे साम्राज्य ‘अपवादात्मक’ आहे का?
  • जागतिक जिहाद – तत्त्वज्ञान आणि ठळक मुद्दे
  • वादळाचा केंद्रबिंदू : जिहाद आणि दक्षिण आशियातील छुपे युद्ध
  • वादळाचा दुसरा केंद्रबिंदू : मध्यपूर्व आणि वायव्य आफ्रिका
  • निष्कर्ष
ताज हाश्मी

ताज हाश्मी यांचा जन्म 1948 साली भारतातील आसाममध्ये झाला. त्यांनी ढाका विद्यापीठातून इस्लामी इतिहास आणि संस्कृती या विषयामध्ये बी.ए. (ऑनर्स) आणि एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून ‘आधुनिक दक्षिण आशियाई इतिहास’ या विषयामध्ये पीएच.डी. पूर्ण केली. हाश्मी सध्या टेनेसीमधील क्लार्क्सव्हिले येथे ऑस्टिन पे स् ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in