Loading...
Image
Image
View Back Cover

इंडिया कनेक्टेड

नव माध्यमांच्या प्रभावाचे समीक्षण

नवमाध्यमे सामाजिक चळवळी उभारण्यात योगदान देऊ शकतात का? नवमाध्यमांच्या चौकटीतून कोण वगळले गेले आहे? सर्वसाधारण जनमानसाच्या वर्तुळावर याचा काय परिणाम होतो? आणि नवमाध्यमांवर कशाप्रकारे अंकुश ठेवता येऊ शकतो?

या प्रश्नांची उत्तरे देताना हे पुस्तक भारतातील नव माध्यमांच्या वाढीचे समीक्षात्मक परीक्षण करते.नव माध्यमांचे कशाप्रकारे सैद्धान्तिकरण केले जाऊ शकते आणि शासन, विकास, व्यापारी जगत आणि सामाजिक विपणनाचे प्रयत्न यांसाठी  नवमाध्यमे संधी आणि आव्हाने कशी ठरू शकतात याचा दृष्टिकोन बहाल करते.

शासन आणि कॉर्पोरेट जगताकडून 'डिजिटल इंडिया' ला दिले जाणारे वाढते महत्त्व पाहता, इंडिया कनेक्टेड हे पुस्तक कल्पकतेने डिजिटायझेशन, एककेंद्राभिमुखता , पारस्पारिकता, सर्वव्यापकता, या भारतीय माध्यमांवर परिणाम करणाऱ्या घटकांचा सखोल अभ्यास करते.

सुनेत्रा सेन नारायण

सुनेत्रा सेन नारायण , पीएच. डी. , - जनसंपर्क, वृत्तपत्रे, लघुपटनिर्मिती, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात 3० वर्षांचा भरीव अनुभव. डॉ. नारायण यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी दूरसंचार विषयातील मास्टर्स पदवी संपादन केली तसेच जनसंपर्क विषयात अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाची "डॉक्टरेट' ही संपादन केली. भारत व अमेरि ... अधिक वाचा

शालिनी नारायणन

शालिनी नारायणन, डी. फील. या वृत्त व जनसंपर्क क्षेत्राच्या सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांना शासकीय व बिगर शासकीय क्षेत्रातील कामाचा सुमारे तीन दशकांचा भरीव अनुभव आहे. सनदी अधिकारी म्हणून सुमारे 23 वर्षे काम केल्यावर 2०13 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. शासकीय सेवेत असताना प्रसार भारतीच्या दूरदर्शन व आकाशवाणी या दोन्ही संस्थांमध्ये ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in