Loading...
Image
Image
View Back Cover

भारतातील महिलांविरुद्धचे सायबर गुन्हे

 • देबारती हालदर - युनायटेडवर्ल्ड स्कूल ऑफ लॉ, अहमदाबाद, गुजरात
 • जयशंकर के. - हे रक्षा शक्ती विद्यापीठ (पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा विद्यापीठ) अहमदाबाद, गुजरात, भारत येथे गुन्हाशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख आहेत.

भारतातील महिलांविरुद्धचे सायबर गुन्हे हे पुस्तक किशोरवयीन मुली आणि महिलांना लक्ष्य करणाऱ्या ऑनलाईन गुन्ह्यांवरील सामाजिक-कायदेशीर संशोधनातील एक महत्त्वाचे योगदान ठरले आहे. मुली किंवा महिला या ट्रोलिंग, ऑनलाईन ग्रूमिंग, गोपनीयतेचा भंग, छळवणूक, अश्लील साहित्य, लैंगिक बदनामी, मॉर्फिंग, स्पूफिंग आणि अशाच गुन्ह्यांच्या सहज लक्ष्य कशा बनतात हे प्रस्तुत पुस्तकातून दर्शवले आहे.

लेखक द्वयींनी महिलांचे सायबर गुन्ह्यांपासून कसे संरक्षण करता येईल; तसेच कोणते प्रतिबंधात्मक पाऊल उचलता येईल? कायदेशीर मदतीस कसा आधार देता येईल आणि सायबर कायदे कसे उपयुक्त आणि सहजसाध्य आहेत या देशातील वाढत्या चर्चेच्या विषयांना संबोधले आहे.

 • प्रस्तावना
 • उपोद्घात
 • ऋणनिर्देश
 • परिचय
 • सायबर स्पेसमध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य
 • ट्रोलिंग आणि लैंगिक स्वरूपातील दादागिरी
 • ऑनलाईन ग्रूमिंग
 • गोपनीयतेचे उल्लंघन
 • ऑनलाईन लैंगिक गुन्हे
 • विस्मृतीत जाण्याचा हक्क: सेवा पुरवठादारांचे दायित्व
 • तपास, अभियोग, अटक आणि ताब्यात घेणेयाकरिता प्रक्रियात्मक व्यवहार
 • गुन्ह्यांशी सामना
 • शब्दसूची
देबारती हालदर

देबारती हालदर या वकील आणि कायदेतज्ज्ञ आहेत. सध्या, त्या गुजरातमध्ये अहमदाबाद येथे युनायटेड वर्ल्ड स्कूल ऑफ लॉ येथे कायदेविषयक अभ्यासाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि भारतातील सेंटर फॉर सायबर व्हिक्टिम काउन्सिलिंगच्या(सीसीव्हीसी) व्यवस्थापकीय संचालिका (मानद) आहेत (www.cybervictims.org). त्यांनी एलएलबी कलकत्ता विद्यापीठातून केले आणि इं ... अधिक वाचा

जयशंकर के.

के. जयशंकर हे सध्या क्रिमिनॉलॉजीचे प्राध्यापक आणि रक्षा शक्ती विद्यापीठ (पोलीस आणि अंतर्गत सुरक्षाविद्यापीठ), अहमदाबाद,गुजरात येथे क्रिमिनॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. त्याआधी, त्यांनी मनोनमनियम सुंदरनर विद्यापीठ, तिरुनवेली, तमिळनाडू, भारत येथे क्रिमिनॉलॉजी आणि क्रिमिनल जस्टिस विभागामध्ये फॅकल्टी सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी लेख, पुस्तके, ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in