Loading...
Image
Image
View Back Cover

जातिव्यवस्थेची नवी समीक्षा

पवित्रतेकडून अपवित्रतेकडे

 • हीरा सिंह - समाजशास्त्राचे , यॉर्क विद्यापीठ, टोरांटो, कनाडा

“जातिव्यवस्थेचे रहस्य: आर्थिक हित, 
 

राजकीय सत्ता आणि धर्माची अपवित्र आघाडी”
 

जातिव्यवस्थेची नवी समीक्षा: पवित्रतेकडून अपवित्रतेकडे हे पुस्तक जातिव्यवस्थेतील आर्थिक, राजकीय, आणि वैचारिक घटकांच्या आंतरक्षेत्राचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करते. वास्तविक जातिव्यवस्था ही धार्मिक व धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या आधारे असलेली जमीन हक्क व राजकीय सत्ता यांची उतरंड दर्शवते. मुख्य प्रवाहातील समाजशास्त्रज्ञ हे जातिव्यवस्थेच्या आचारपद्धतीतील एकजिनसीपणावरच लक्ष केंद्रित करत असल्याने आंतरजातीय असमानतेकडे दुर्लक्ष होत असलेले दिसून येते. ऐतिहासिक व मानववंशशास्त्रीय पुराव्यानुसार जातीची निर्मिती हिंदुत्वातून झालेली नसून जातीशिवाय हिंदुत्व ही अद्भुतरम्य कल्पना नाही असा प्रतिवाद लेखक करतात.
 

या पुस्तकातून एक अतिशय महत्त्वाची बाब निदर्शनास येते ती म्हणजे, एकाच जातीच्या सदस्यांच्या वर्गहितसंबंधामध्ये जर अंतर असेल तर ते सामूहिक संघटनासाठी असमर्थ ठरतात. उलटपक्षी विविध जाती-उपजातींच्या सदस्यांत समान वर्गहितसंबंध असल्यास ते राजकीयदृष्ट्या संघटित होतात. अशा स्वरूपाच्या कृतीवरून भारतात जातीविषयक जाणिवा या वर्ग जाणिवांपेक्षा वरचढ असतात हा गैरसमज दूर होतो.

 

 • प्रस्तावना: जातींतील जडणघडण, जातीचा अभ्यास करताना– एक वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभव
 • ऋणनिर्देश
 • विषयप्रवेश
 • जातीचा अभ्यास: संकल्पना, भौतिक परिस्थिती आणि इतिहास
 • पुरोहित आणि राजा: दर्जा-सत्ता यांच्यातील गोंधळ
 • वर्ण ते जात: धार्मिक आणि आर्थिक-राजकीय
 • जात आणि सबाल्टर्न अभ्यास: अभिजनांची विचारधारा,संशोधक धाटणीचे इतिहासलेखन
 • जातींमधल्या आणि जात्यंतर्गत विषमता: नातेसंबंध, जात आणि जमीन
 • बदलते जमीनसंबंध आणि जात: एका गावाची वस्तुस्थिती
 • वेठबिगारी, धर्म आणि जात: हिंदुत्व आणि जातीविषयीची जुळी मिथकं
 • परिशिष्टे
 • शब्दार्थसूची
 • संदर्भग्रंथसूची
 • लेखकाविषयी
हीरा सिंह

हीरा सिंह टोरोंटो येथील यॉर्क विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तत्पूर्वी ते दिल्ली विद्यापीठातील दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तसेच कॅनडातील विलफ्रिड लॉरियर, व्हिक्टोरिया आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यू ब्रून्सविक आणि सेंट थॉमस युनिव्हर्सिटी यांसारख्या अनेक विद्यापीठांमध्ये समाजशास्त्राचे अध्यापन करीत होते. श्रीयुत सिंह जर्नल ऑफ पीझन्ट स्टड ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in