Loading...
Image
Image
View Back Cover

दैनंदिन व्यवहारासाठी अर्थशास्त्र

विकास क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी सुलभ मार्गदर्शक

दैनंदिन व्यवहारासाठी अर्थशास्त्र हे पुस्तक सार्वजनिक वाद-प्रतिवादांतील अशा सहभागींना आवश्यक ज्ञान प्रदान करते ज्यांना अर्तशास्त्राची पार्श्वभूमी नाही आणि जे अर्थशास्त्राच्या विवेकपूर्ण सिद्धान्ताच्या माध्यमातून आपल्या युक्तिवाद आणि विश्लेषणांना दृढतेने मांडू इच्छितात. यात विकासकार्ये आणि हस्तक्षेप यांत अर्थशास्त्राचा वापर करण्याकरता विशेष क्लुप्त्याही दिल्या आहेत. लेखकाने अर्थशास्त्रात अंतर्भूत विचार आणि संबंध यांना प्रत्यक्ष जीवनातील अशा समस्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांचा सामना आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो.

 

हे पुस्तक म्हणजे विकासाच्या अभ्यासकांसाठी आणि नागरी-सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी या विषयाचे कुठलेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही, अशांसाठी अर्थशास्त्राचा सर्वसमावेशक सारांश आहे. या पुस्तकातून स्वतंत्र प्रकरणांच्या माध्यमाद्वारे दारिद्र्य, असमानता, सामाजिक आणि लिंग भेद आणि पर्यावरणीय प्रभाव या महत्त्वाच्या प्रश्नांचा मागोवा घेतला आहे.

 

 • प्रस्तावना
 • प्रास्ताविक
 • विभाग १: विषयप्रवेश
 • १. विकास व्यावसायिकांनी अर्थशास्त्राचा अभ्यास का करावा?
 • २. अर्थशास्त्र म्हणजे काय?
 • विभाग २: अर्थशास्त्राची विश्लेषणात्मक चौकट
 • ३. व्यक्ती आणि उत्पादनसंस्थाची तार्किक निवड
 • ४. बाजारपेठांचे विश्लेषण
 • ५. अपुऱ्या बाजारपेठा असणारी परिस्थिती
 • ६. सहसंबंधांतील व्यूहरचनांचे विश्लेषण
 • ७. समग्रलक्षी अर्थशास्त्रीय वातावरणाचा संक्षिप्त परिचय
 • विभाग ३: विकास आणि वृद्धी
 • ८. मानव संसाधन विकास
 • ९. वृद्धीचे अर्थशास्त्रः भाग १
 • १०. वृद्धीचे अर्थशास्त्रः भाग २
 • ११. अल्पविकासाचे अर्थशास्त्रः भाग १
 • १२. अल्पविकासाचे अर्थशास्त्रः भाग २
 • विभाग ४: वितरणातील समस्या आणि शाश्वतता
 • १३. गरीब आणि गरिबी
 • १४. विषमता
 • १५. सामाजिक आणि लिंगविषयक भेदभावावरील आर्थिक आकलन
 • १६. पर्यावरणीय परिणामाचे अर्थशास्त्र
 • विभाग ५: व्यक्ती आणि कुटुंब यांपलीकडे
 • १७. शासनाची भूमिका
 • १८. शासकीय अपयश आणि बिगरशासकीय कार्ये
 • १९. संस्था आणि विकास
 • २०. राजकीय अर्थव्यवस्था आणि विकास
 • विभाग ६: विकास व्यवहाराच्या पद्धतींची उपलब्धता
 • २१. विकासासाठीच्या हस्तक्षेपात अर्थशास्त्राचा वापर
 • २२. संघटना आणि नियमांचा आराखडा तयार करण्यासाठी आणि विश्लेषणासाठी अर्थशास्त्राचा वापर
 • संदर्भ ग्रंथसूची
वी. शांताकुमार

वी. शांताकुमार सध्या बेंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात विकासविषयक व्यावसायिकांसाठी अर्थशास्त्राचे अध्यापन करत आहेत. 1996 पासून पुढे 15 वर्षे ते त्रिवेंद्रम येथील सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज येथे कार्यरत होते आणि सध्या ते तेथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम पाहतात. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधील लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी सेजद्वारा प्रकाशित ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in