Loading...
Image
Image
View Back Cover

गांधीप्रणीत अर्थशास्त्राच्या पलीकडे

एक सर्जनशील भंजन

 • बी. एन. घोष - प्राध्यापक, लीड्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अण्ड टेक्नॉलॉजी, युके

गांधीप्रणीत अर्थशास्त्राच्या पलीकडे हे पुस्तक गांधीप्रणीत अर्थशास्त्र नवअभिजात धाटणीचे नाही, हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. गांधींचे अर्थशास्त्र आर्थिक उपयोजन अथवा आर्थिक धोरणांचे सामाजिक, राजकीय आणि नैतिक विश्लेषण करणाऱ्या अर्थशास्त्राच्या सुव्याख्यित परिघापलीकडे जाते. नैतिक तत्त्वज्ञान, राजकारण आणि समाज यांच्या व्यापक पटावरील समस्यांविषयीची गांधींची व्यक्तिगत मते रूढार्थाने गांधीप्रणीत अर्थशास्त्र म्हणून ओळखली जातात.
 

गांधीप्रणीत अर्थशास्त्राचा नेमका आशय समजून घेताना निर्माण झालेले अंतर भरून काढणे हे प्रस्तुत पुस्तकाचे उद्दिष्ट होय. प्रस्तुत पुस्तक गांधीप्रणीत अर्थशास्त्राची सीमा ओलांडून गांधींनी अनेक प्रश्नांचा परामर्श घेतला असा दावा करते. गांधींनी परामर्श घेतलेले हे प्रश्न विशुद्ध अर्थशास्त्राच्या परिघामध्ये समाविष्ट होत नाहीत. प्रस्तुत पुस्तक आतापर्यंत अनभिज्ञ असलेल्या गांधीप्रणीत राजकीय आर्थिक सिद्धान्ताचा समंजसपणे मागोवा घेते. 

 

 • प्रस्तावना
 • गांधीप्रणीत अर्थशास्त्राचा परिशोध
 • गांधीप्रणीत ‘मानव’ संकल्पना
 • गांधींच्या विचारांतील अवलंबित्व, एकात्मता आणि बदलाची गतिशीलता
 • दारिद्र्य आणि आर्थिक विषमतेचे गांधींचे आकलन
 • संघर्ष व्यवस्थापनः गांधींचे तत्त्वज्ञान
 • द्वंद्ववाद आणि विकास हेगेल, मार्क्स आणि गांधी
 • धोरणाधारित समन्याय गांधींच्या परिप्रेक्ष्यातून समकालीन आत्मजाणीव
 • राजकारण, सत्ता, अभिशासन आणि गांधी
 • शाश्वत विकास आणि गांधी
 • गांधीप्रणीत अर्थशास्त्राचे नवअर्थांकन
 • संदर्भग्रंथ सूची
बी. एन. घोष

 बी. एन. घोष, पीएच.डी. (भारत), पीएच.डी. (ऑस्ट्रेलिया), एमसीआयएम (यु.के), जीएफसीआर (हार्वर्ड), हे लीड्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलोजी, यु. के. येथे अभ्यागत प्राध्यापक होते. इस्टर्न मेडिटेरेनियन युनिव्हर्सिटी, सायप्रस, युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स, पेनांग (मलेशिया), आणि झिजियांग गोंगशांग युनिव्हर्सिटी, चायना येथेदेखील ते अभ ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in