Loading...
Image
Image
View Back Cover

भारतातील समाज

भारतीय समाजाचे हे व्यापक विश्लेषण, या समाजातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी करण्यात आलेल्या आधुनिक सामाजिक संशोधनाचा परिपाक आहे.  भारतातील समाज हे पुस्तक सामाजिक संबंधांना व्यवस्था आणि उपव्यवस्थांच्या स्वरूपात पाहते.  हे संबंध स्थिर आणि कुंठित नसून, प्रवाही आणि बदल आत्मसात करणारे आहेत. वर्षानुवर्षांच्या मानसशास्त्रीय आणि सामाजिक संकल्पनांवर ते आधारित असतात.

 

या आवृत्तीमध्ये दोन खंडांचा समावेश आहे.  खंड एक: सातत्य आणि बदल सामाजिक व्यवस्था आणि जातिव्यवस्थेचा आढावा घेतो.  हे करताना भारतीय समाजातील महत्त्वाच्या घटकांची व्याख्या मांडतो.  यातील प्रकरणांमध्ये नातेसंबंधांची गुंतागुंत, त्यांचे मानसशास्त्रीय परिणाम, त्यांतून होणारी  सांस्कृतिक घुसळण याचा परामर्श घेण्यात आला आहे.  खंड दोन: बदल आणि सातत्य सामाजिक बदलांवर भाष्य करतो. ते नियमित असतात किंवा रचनात्मक असतात. मानसिकतेतील बदल आणि सामाजिक प्रक्रिया यांच्या परस्परसंबंधांची चर्चा या खंडात आढळते. आधुनिक समाजातील बदल कशा प्रकारे घडून येत आहेत, यावरही भाष्य आहे.

 

 • अनुक्रमणिका
 • प्रस्तावना
 • खंड १: सातत्य व बदल
 • विभाग १: परिचय
 • 1. कार्य, संकल्पना आणि व्याप्ती
 • सामाजिक व्यवस्था व जातीच्या उतरंडीची संकल्पना पुराव्याचे स्वरूप
 • व्याप्ती, काळ आणि रोख
 • 2. मूलभूत समूह व वर्गीकरण
 • जाती
 • जातीय संबंध व भूमिका यामधील लवचीकता
 • जातींमधील समूह व त्यांचे वर्गीकरण
 • जातसमूह
 • वर्ण: गावकऱ्यांचा सिद्धान्तव सिद्धान्तातील तर्कदोष
 • घटक समूह व सामाजिक संकल्पना
 • विभाग २: कुटुंब आणि नातेसंबंध
 • 3. कुटुंब
 • आदर्श प्रारूप व प्रत्यक्षातील स्वरूप
 • कौटुंबिक भूमिकांमधील उतरंड
 • कुटुंबाचीकार्ये
 • कुटुंबांतर्गत संबंधांमधील बदल
 • कौटुंबिक रचनेतील आर्थिक घटक
 • प्रदेशा-प्रदेशांमधील फरक
 • 4. नातेसंबंधांचे व्यापक बंध घराणे
 • घराण्याचे बंध आणि धार्मिक विधी
 • आर्थिक आणि कायदेशीर प्रकरणांतील वंशाचे बंध
 • कूळ
 • आप्तसमूहातील गोत्र आणि इतर संकल्पना
 • स्त्रीवर्गाशी संबंधित नातलग
 • मानलेलीनाती
 • नातेसंबंधांचे उपयोग
 • उत्तर आणि दक्षिण भारतातील जवळच्या नात्यांचे बंध
 • सारांश
 • भाग ३: विविध जातीच्या लोकांमधील संबंध
 • 5. जातींच्या क्रमवारीचा निकष
 • वर्तनाचे क्रमविरहित संदर्भ
 • धार्मिक निकष: वैयक्तिक शुद्धता आणि अशुद्धता
 • विशेष शुद्धतेची आवश्यकता असणाऱ्या भूमिका
 • सामूहिक विटाळ आणि जातीची क्रमवारी
 • 6. धर्मनिरपेक्ष निकष आणि जातींच्या क्रमवारीचे आरोपण
 • प्रापंचिक प्रभावाची अंमलबजावणी
 • सत्तेचे स्रोत
 • कर्मकांडांच्या आणि ऐहिक साधनस्रोतांचा परस्परांकडून होणारा वापर
 • जातींच्या गटांनुसार
 • श्रेणीचे आरोपण श्रेणीक्रमाविषयी सहमती आणि मतभेद
 • 7. सांस्कृतिक फरक आणि जातिव्यवस्था
 • धार्मिक कर्मकांडांमधील फरक
 • सांस्कृतिक विरोधाभास आणि त्यांचे सामाजिक परिणाम
 • सारांश
 • विभाग 4: जातीअंतर्गत नातेसंबंध
 • 8. जातगटांतील विरोध आणि सलोखा
 • आव्हाने आणि पुनर्रचना
 • सोयरीक विकास आणि सोयरगटांच्या निर्मितीमधील फरक
 • जातगटातील सलोख्यासाठीचे प्रेरक घटक
 • 9. पंचायतींचे उपयोग
 • धार्मिक कृत्यांमधील त्रुटी दूर करणे
 • अंमलबजावणीच्या आणि अधिकारक्षेत्राच्या समस्या
 • वादांचे निराकरण आणि सरकारी न्यायालये
 • न्यायालय आणि पंचायत यांचे अधिक्षेत्र
 • खंड २: बदल आणि सातत्य
 • विभाग ५: गाव, प्रदेश, संस्कृती
 • 10. गाव: स्वतंत्र चुली आणि सामायिक घर
 • गावातील एकजूट
 • वसाहतींचे आकृतिबंध आणि एकीचे संबंध
 • ग्रामीण व्यवस्थेवरील आर्थिक आणि इतर प्रभाव
 • गावातील कचेऱ्या: गावाचा प्रमुख
 • गावातील कचेऱ्या: तलाठीव इतर कचेऱ्या
 • गावकरी-एकत्र आणि विभक्त
 • 11. गाव: अंतर्गत नियमन
 • प्रभावशाली जाती
 • वर्चस्वाची चलनशीलता
 • ग्रामपंचायत
 • गावातील सोयरगट आणि सत्तेतील बदल
 • 12. गावकरी आणि नागरी संस्कृतीमधील वारंवार उद्भवणाऱ्या काही समस्या
 • जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्राच्या मोठ्या व्यवस्था
 • अर्थशास्त्र, राजकारण आणि धर्म यांतील दुहेरी कार्ये
 • विशेष भूमिका
 • भूमिका आणि कार्यक्षेत्रे
 • गाव, नागरी संस्कृती आणि बदल
 • विभाग 6: सामाजिक चलनशीलतेच्या माध्यमातून पुनःपुन्हा उद्भवणारे बदल
 • 13. सांस्कृतिक अनुकूलन आणि चलनशीलता यांसाठीची प्रारूपे
 • नाव आणि प्रथांमधील बदल
 • वर्ण–एक संदर्भवर्ग
 • क्षत्रिय प्रारूपे
 • ब्राह्मण प्रारूपे
 • वैश्य आणि ‘शूद्र’ प्रारूप
 • संदर्भगट
 • संदर्भवर्ग म्हणून आधुनिकीकरण
 • 14.अंतर्गत संलग्नता जपणे: विखंडन आणि एकत्रीकरण विखंडन
 • जातीचे विलगीकरण आणि राजकीय संलग्नता: जातव समाज
 • एकत्रीकरणाचे प्रेरक
 • 15.जातीच्या सुधारणेची आधुनिक साधने: संघ आणि महासंघ
 • पुनरुज्जीवन झालेला जाटांचा एक संघ
 • धार्मिक संस्था: केरळातील इरावा
 • आधुनिक पंचायत संस्था: ओरिसातील तेली
 • कानपूर शहरातील जातसंघ
 • आरंभिक संघ: पश्चिम उत्तर प्रदेशातील कुंभार समाज
 • राजकीय सहभाग: वान्नियार संघ
 • राजकीय सहभाग: नाडर संघ
 • महासंघ: गुजरात येथील क्षत्रिय सभा
 • व्यापक बंध आणि सखोल बदल
 • विभाग 7: धार्मिक आणि आदिवासी चळवळींतून होणारे पुनरावर्ती बदल
 • 16. बाहेरून आलेल्या धर्मांचे सामाजिक पैलू: मुस्लीम
 • धार्मिक विषमता आणि सामाजिक साम्ये
 • उत्तर प्रदेशातील मुस्लीम
 • पश्चिम पाकिस्तानातील गावे (खेडी)
 • मुस्लिमांची सामाजिक चलनशीलता
 • इस्लामीकरण आणि आधुनिक अनुकूलन
 • 17. बाहेरून आलेल्या धर्मांचे सामाजिक पैलू: ज्यू, पारशी, ख्रिश्चन
 • ज्यू: दोन वसाहती, पाच जाती
 • पारशी
 • सुरुवातीच्या काळातील ख्रिश्चन आणि नंतरच्या महासंघातील ख्रिश्चन
 • ख्रिश्चन धर्मातील जात: तमिळनाडूतील नाडर(मद्रास)
 • धार्मिक रूपांतर आणि पुनरावर्ती बदल
 • 18. आदिवासी लोकांची वाढ
 • आदिवासी: अधिकृत स्थान आणि प्रत्यक्षातील वैशिष्ट्ये
 • आदिवासी समाज आणि जातिव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांची तुलना
 • जातीमूल्यांकडे स्थलांतर
 • जातीय व्यवस्थेतील आकर्षणे आणि प्रतिकर्षणे
 • 19. आदिवासींच्या बदलाची दिशा
 • धोरणात्मक समस्या आणि दीर्घकालीन प्रवाह
 • ओरिसातील बडेरी गावचे कोंड
 • तमिळनाडूच्या(मद्रास) नीलगिरी पर्वतातील कोटा समाज
 • पश्चिम बंगालच्या बाराभूमचे भूमिज
 • उत्तर प्रदेशातील जोहार खोऱ्यातले भोटिया
 • बिहारमधील जमशेदपूरजवळचे संथाळ
 • सामाजिक स्थित्यंतरे आणि पद्धतशीर टप्पे
 • विभाग 8: सलगता आणि प्रवाह
 • 20.मानसशास्त्रीय प्रेरक घटक, सामाजिक प्रक्रिया आणि पद्धतशीर बदल
 • व्यक्तिगत वर्तनाच्या संकल्पना
 • व्यवस्थात्मक प्रक्रियांच्या स्वरूपातील स्पर्धा आणि संघर्ष
 • जुळवून घेण्याच्या क्षमता
 • सामाजिक चलनशीलता आणि व्यवस्थेची देखभाल
 • पुनरावर्ती आणि व्यवस्थात्मक बदल
 • 21. प्रवाह
 • सामाजिक बदलामागील चालना आणि अडथळे
 • सामाजिक बदलाविषयीचे गैरसमज
 • कौटुंबिक बदल आणि सातत्य
 • कौटुंबिक भूमिकांमधील आणि कर्तव्यांमधील बदल
 • विवाहपद्धतींमधील बदल
 • बदलाचा नमुना
 • परिशिष्ट: व्यवस्था आणि स्तरीकरणाच्या संकल्पना
 • संकल्पनांचे उपयोग
 • “जातिव्यवस्था” ही कुठल्या प्रकारची व्यवस्था आहेॽ
 • संदर्भग्रंथसूची
डेव्हिड जी. मंडेलबाउम

Biography not available.

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in