Loading...
Image
Image
View Back Cover

भारतातील लोकसंख्याविषयक समस्या

बदलते कल, धोरणे आणि कृतिकार्यक्रम

ढती लोकसंख्या ही कोणत्याही देशाची राज्यव्यवस्था आणि विकास यांना भेडसावणारी समस्या असते. भारतातील धार्मिक विविधता आणि विविध सामाजिक स्तर लक्षात घेता ही समस्या ठळकपणे जाणवते. भारतातील लोकसंख्याविषयक समस्या: बदलते कल, धोरणे आणि कृतिकार्यक्रम हे पुस्तक स्वातंत्र्योत्तर कालखंडात सात दशके ही समस्या या देशाने कशा प्रकारे हाताळली याचे विश्लेषण करते. 
 

प्रस्तुत पुस्तक परिस्थितीनुरूप औचित्यपूर्ण ठरलेली धोरणे आणि कार्यक्रम यांवर चर्चा करते, आणि वेगवेगळ्या कालखंडात लोकसंख्येच्या प्रश्नाचे आकलनबाबत ऊहापोह करते. भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाने साध्य केलेली फलनिष्पत्ती आणि त्याची यशस्विता यावर प्रकाश टाकते.
 

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासकाने लिहिलेले हे पुस्तक, या देशातील लोकसंख्याविषयक समस्यांशी परिणामकारक पद्धतीने सामना करण्याकरिता सुयोग्य धोरणांची शिफारस करते.

 

 • प्रस्तावना
 • १ कुटुंबनियोजन कार्यक्रमाचा प्रारंभ: ब्रिटिश कालखंडातील भारतामधील लोकसंख्येशी संबंधित समस्या
 • २ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९७७ पर्यंतची लोकसंख्याविषयक धोरणे आणि कार्यक्रमः अधिकृत संततिनियमन कार्यक्रमाचा प्रारंभ
 • ३ आणीबाणीपश्चात कार्यक्रमाची पुनर्उभारणी (१९७७–९५): पिछेहाट आणि पुनर्उभारणी
 • ४ लोकसंख्या आणि विकासविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेनंतरचा विकासाचा टप्पाः (१९९६–२०१५) कार्यक्रमांचे निष्प्रभावी एकत्रीकरण
 • ५ संस्कृती आणि नैसर्गिक प्रजनन क्षमता
 • ६ विवाहसंस्था आणि वैवाहिक स्थैर्य
 • ७ लोकसांख्यिकी पातळ्या, सर्वसामान्य प्रवृत्ती, व्यवच्छेदक लक्षणे आणि आव्हाने
 • ८ भारताशी तुलना करताना
 • ९ लोकसंख्येच्या समस्येवरील अनिश्चित आंतरराष्ट्रीय आणि शैक्षणिक भूमिका
 • १० प्रगतिपथावर
 • परिशिष्ट
 • संदर्भग्रंथ सूची
कृष्णमूर्ती श्रीनिवासन

कृष्णमूर्ती श्रीनिवासन गेली पाच दशके त्यांच्या संशोधनाद्वारे लोकसंख्येसंबंधीच्या अध्ययनामध्ये अमूल्य योगदान देत आहेत. श्रीनिवासन हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकसंख्याशास्त्रज्ञ असून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्या आणि संस्थांच्या माध्यमातून त्यांनी देशाची सेवा केली आहे. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आणि राष्ट्रीय सांख्यिकी आ ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in