Loading...
Image
Image
View Back Cover

परिकल्पित हिंदुवाद

ब्रिटिश प्रोटेस्टंट मिशनरीकृत हिंदुवादाची रचिते,1793-1900

 • जेफ्फ्री ए. ऑडी - मानद ज्येष्ठ व्याख्याते, सिडनी विद्यापीठातील इतिहास विभागामध्ये, मानद ज्येष्ठ व्याख्याते.

प्रस्तुत पुस्तक अठराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि एकोणिसावे शतक यादरम्यान ब्रिटिश प्रोटेस्टंट धर्मप्रचारकांनी हिंदुवाद ही संकल्पना विकसित केली, तिचा उगम आणि कालक्रमानुसार या संकल्पनेची येत गेलेली स्पष्टता याचा शोध घेत, तो सर्व पट उलगडून दाखवणारा महत्त्वपूर्ण ऐवज आहे. धर्मप्रचारकांची उत्तर-प्रबोधनकालीन युरोपातील विचारांच्या मुशीतील जडणघडण, धर्माची ख्रिश्चन धर्मीय संकल्पना, भारताचे वसाहतकालीन वास्तव आणि ख्रिश्चन धर्माचा नेमका प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी ‘शत्रूला जाणून घेण्याची’ त्यांची गरज, या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम त्यांच्या हिंदुवादाच्या मांडणीवर कसा झाला, हे लेखक, जेफ्फ्री ऑडी विशद करतात.

 

धर्मप्रचारकांनी करून ठेवलेल्या लेखनाचा आधार घेत, सुरुवातीच्या टप्प्यात पेगन किंवा ख्रिश्चनेतरांचा हिंदुवाद अशा प्राथमिक मांडणीने सुरुवात होत, हिंदुवाद ही एकात्म, ब्राह्मण वर्णवर्चस्वी ‘व्यवस्था’, मूर्तिपूजेचे अवडंबर करणारी, अंधश्रद्धा आणि व्यभिचार बोकाळलेली आहे, इतकी स्पष्टता नंतर धर्मप्रचाराकांनी विकसित केलेल्या प्रभावी रूपबंधामध्ये कशी येत गेली हे लेखक दाखवून देतात. या ‘परक्या’ धर्माची तुलना इवॅन्जेलिक ख्रिश्चन धर्माशी केली आहे, कारण या पंथामध्ये कर्मकांडापेक्षा समर्पण भावनेने केलेली भक्ती मोलाची असून, व्यक्ती शोषण आणि ‘पौरोहित्य’ यांचा बळी ठरत नाही.

 

सरतेशेवटी, पुस्तकामध्ये हिंदुवादाच्या अशा प्रकारे केलेल्या मांडणीचा भारत आणि पश्चिमेकडे कसा प्रभाव पडत गेला हे विचारात घेतले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस हिंदुवाद हे घटित जवळून अनुभवल्यानंतर धर्मप्रचारकांचा दृष्टिकोन सौहार्दपूर्ण तर झालाच, शिवाय यातून त्यांनी एकात्म प्रारूप हिंदुवादाला लावून पाहिले. ‘अनेक हिंदू धर्म आहेत’ असे काहींचे मत होते. याउलट, हिंदू नेत्यांमध्ये हिंदू असणे आणि हिंदुवाद हे अभिन्न आहेत, ही धारणा घट्ट झाली होती.

 

प्रस्तुत पुस्तकामध्ये ज्ञानाचे स्वरूप, धर्माच्या संकल्पना, हिंदुवादातील संकल्पना, पौर्वात्यवादी विचारांच्या आधारे केलेले खंडनमंडन आणि मिशनरी आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यातील नातेसंबंध या विषयांची चर्चा विस्ताराने केली आहे. हे विद्वत्तासंपन्न, अभ्यासपूर्ण लेखन दक्षिण आशियाचा इतिहास, धर्म आणि समाज, तसेच मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, बौद्धिक क्षेत्रातील घडामोडींचा इतिहास आणि राज्यशास्त्र या विद्याशाखांचे विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्यावर आपली मोहिनी घालेल हे निश्चित!

 

 • विषयप्रवेश

विभाग १: प्रभावाचे वारेः ब्रिटिश कल्पनेतील हिंदुवाद, १६००-१८००

 • १. मिशनरींचा प्रवास आणि नोंदींमधील हिंदुवाद, १६००-१८००
 • २.अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मिशनच्या प्रोटेस्टंट सहप्रवाशांनी मांडलेला हिंदुवाद
 • ३. पौर्वात्य प्रारूप आणि मिशनरी ज्ञानमीमांसा

विभाग २: मिशनरी अभ्यासक्रमनिर्मिती

 • ४. मिशनरी शिक्षण आणि प्रशिक्षणातील हिंदुवाद
 • ५. प्रभावी विचारपीठाचा उदय
 • (अ) विल्यम कॅरेः अन्वेशकाची शोधयात्रा
 • (आ) विल्यम वॉर्ड यांचा इतिहास
 • ६. डफ, मंडी आणि इतरः आशयाच्या रूपबंधात्मक मांडणीचे पालनकर्ते
 • ७. मिशनरी सोसायटी नियतकालिक वाङ्मयातील हिंदुवाद
 • ८. बदलता संदर्भः हिंदुवादाच्या मिशनरी आकलनास कारणीभूत घडामोडी, १८५०-१९००
 • ९. सन १८५०-१९०० या काळातील प्रभावी दृष्टिकोनाचे टीकाकार आणि समीक्षक
 • १०. सहसंवेदना वा अन्यभाव? बदलते मूल्यमापनः एकोणिसाव्या शतकातील हिंदुवाद
 • ११. इंग्लंडमधील चर्चच्या झेनाना मिशनरी सोसायटीच्या विशेष संदर्भाने हिंदुवादाच्या बांधणीमधील लिंगभावात्मक मुद्दे, १८८०-१९००
 • निष्कर्ष
 • संदर्भग्रंथ सूची
जेफ्फ्री ए. ऑडी

जेफ्फ्री ए. ऑडी हे ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये सहयोगी मानद संशोधक आहेत. या विभागामध्ये १९६४ सालापासून ते इतिहासाचे व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत आणि युनायटेड थिओलॉजिकल कॉलेज, बेंगलोर (२००३) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन करत आहेत.

डॉ. ऑडी यांचे पहिले पुस्तक १९५७ साली प्रसिद्ध झाले. आतापर्यंत त्य ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in