Loading...
Image
Image
View Back Cover

भगवे ध्वज आणि गोल टोप्या

हिंदुत्व, मुस्लीम अस्मिता आणि भारत नावाची कल्पना

बहुसंख्य मुस्लीम, मुहम्मद इक्बाल यांच्या लेखणीतून झरलेले सारे जहॉं से अच्छा हे गीत उंच आवाजात गात असलेल्या कालखंडात आपण वावरत आहोत. याच तत्त्वज्ञ-कवीने रामाचा उल्लेख इमाम-ए-हिंद असा केला होता याचे अनेकांना विस्मरण झाले आहे. याच दरम्यान, हिंदुत्ववादी शक्तींना त्यांच्या विभेदी राष्ट्रवादाची पाठराखण करताना सारे जहॉं से अच्छा हे एकात्मतेचे गान विस्मृतीत गेले आहे. त्यांच्या बहिष्कृत पद्धतीच्या राजकारणाची नाळ ही ‘ते’ आणि ‘आम्ही’ अशा स्वतःभोवती आखलेल्या कुंपणाच्या विभाजनवादी मानसिकतेत सापडली आहे. त्यांच्या या वर्तुळात ‘वंदे मातरम्’ उच्चारण्यास नकार देणाऱ्या मुस्लिमास भोसकले जाते.   

 

भगवे ध्वज आणि गोल टोप्या हे पुस्तक वि.दा. सावरकर आणि मा.स. गोळवलकर यांच्या काळापासून ते सांप्रतच्या कालखंडापर्यंत हिंदुत्ववादी विचारधारा कशा प्रकारे वाढत गेली, तसेच मुस्लीम समन्वयाच्या चर्चांअगोदरच ती कशा प्रकारे आडकाठी आणते, याचा माग काढते. एकीकडे मुस्लीम समुदाय आपल्या अस्तित्वाचेच आव्हान पेलत आहे आणि त्याच वेळी, आपल्या शब्दांद्वारे तृणमूल पातळीवर धीरोदात्तपणे बदल घडवणारे इस्लामचे अभ्यासक आणि अध्यापक फरहात हाश्मी यांचे विचारमंथन अनुभवत आहे. या सर्व आव्हानांच्या गदारोळात, भारताचे कल्पनाचित्रही अडचणीत सापडले आहे, आणि हे राष्ट्र योग्य दिशेच्या शोधात आहे.

 

 • प्रस्तावना डॉ. निर्मला लक्ष्मण
 • प्रास्ताविक
 • ऋणनिर्देश
 • भाग १: हिंदुत्व
 • हिंदू राष्ट्र: संकल्पना
 • राष्ट्रधुरिणांचा पुनर्शोध
 • रास्वसं आणि काठावरील घटक समजून घेताना
 • इतिहासाच्या नजरेतून राष्ट्र
 • भाग २: मुस्लीम अस्मिता
 • मुस्लीमपण
 • जमात आणि धर्म
 • इस्लाम आणि प्रथा
 • उपरे नसले तरी
 • भाग ३: भारताचे संकल्पचित्र
 • आपण सारेच परकीय
 • संदर्भग्रंथ सूची
ज़ियाउस्सलाम

ज़ियाउस्सलाम हे प्रथितयश वाङ्मयीन आणि सामाजिक समीक्षक आहेत. सलाम द हिंदू या वृत्तपत्राशी गेले १८ वर्षे संलग्न आहेत आणि ते गेली १६ वर्षे द हिंदूच्या उत्तर भारतीय आवृत्तींसाठी फीचर्स एडिटर म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते फ्रंटलाईन या पाक्षिकाचे सहयोगी संपादक असून या नियतकालिकासाठी पुस्तक परीक्षणे आणि सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांवर लेखन करतात. सलाम ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in