Loading...
Image
Image
View Back Cover

दलितांचे सशक्तीकरण

आर्थिक आणि सामाजिक दरी सांधण्याचे आव्हान

 • सुखदेव थोरात - भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर); प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

दलितांचे सशक्तीकरण: आर्थिक आणि सामाजिक दरी सांधण्याचे आव्हान, हे पुस्तक एकमेकांशी संबंधित असलेल्या चार विषयांवर भाष्य करते.  भारतीय समाजातील मूळचे रहिवासी असलेल्या आणि वगळणूक झालेल्या गटांच्या वगळणुकीशी संबंधित  वंचिततेची संकल्पना या पुस्तकात मांडण्यात आली आहे; तसेच हे पुस्तक सामाजिक वगळणुकीचा सर्वसाधारण अर्थ व संकल्पना उलगडून सांगते; तसेच जातीय अस्पृश्यता व वांशिकता यांच्यावर आधारित वगळणुकीचा अर्थ व संकल्पना विशेषत्वाने स्पष्ट करते. त्यानंतर हे पुस्तक दलित आणि आदिवासी यांच्या वंचित समूहांच्या सद्यःस्थितीविषयी माहिती देते आणि मानवी विकास साध्य करण्याच्या बाबतीत सामाजिक गटांमध्ये असलेली विषमता टिपते. पुढे जाऊन हे पुस्तक या वंचित गटांना कमी प्रमाणात उपलब्ध असलेली संसाधने, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक गरजेची साधने या विषयांनुसार या गटांच्या उच्च प्रमाणातील वंचिततेशी संबंधित घटकांचे विश्लेषण करते. सरतेशेवटी, हे पुस्तक आर्थिक, नागरी आणि राजकीय वर्तुळांतील गटांमध्ये सातत्याने आढळून येणाऱ्या असमानतांमागील जातीय भेदभावाची भूमिका ठळकपणे मांडते.

 

वाचकांच्या आकलनसुलभतेसाठी सुसंगत आणि अद्ययावत डेटा, व्यष्टिअध्ययने आणि नागरी, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांच्या उल्लंघनासंबंधीच्या लक्षवेधी बातम्या यांचा वापर करून हे सर्व विषय सोप्या भाषेत मांडले आहेत. 

 

 • प्रस्तावना
 • परिचय सुखदेव थोरात आणि निधी सदाना सभरवाल
 • 1 वगळणूक, वंचितता आणि मानवी विकास: वगळणूक झालेल्या समूहांच्या अभ्यासाकरिता संकल्पनात्मक चौकट सुखदेव थोरात, अर्जन डी हान आणिनिधी सदाना सभरवाल
 • 2 भेदभावाच्या विरोधातील आणि सक्षमीकरणासाठीचे शासकीय धोरण निधी सदाना सभरवाल
 • 3 वगळणूक आणि भेदभाव: समकालीन चित्र सुखदेव थोरात आणि प्रशांत नेगी
 • 4 सामाजिक गटनिहाय मानवी विकास आणि मानवी दारिद्र्य सुखदेव थोरात आणि एस. वेंकटेसन
 • 5 सामाजिक गटांच्या उपभोग खर्चाचे स्तर आणि आकृतिबंध अश्विनी देशपांडे
 • 6 दारिद्र्याचे स्तर आणि विषमता अर्जन डी हान आणि अमरेश दुबे
 • 7 साक्षरता आणि शैक्षणिक स्तर सच्चिदानंद सिन्हा
 • 8 घर आणि घरातील सुखसोयी सच्चिदानंद सिन्हा
 • 9 आरोग्य आणि पोषणविषयक स्थिती विजयकुमार बारीक आणि पी. एम. कुलकर्णी
 • 10 व्यावसायिक आकृतिबंध एम. थंगराज
 • 11 कृषीविषयक व भांडवली मालमत्तांची उपलब्धता आर. एस. देशपांडे आणि मोतीलाल महामलिक
 • 12 रोजगार आणि बेरोजगारीविषयीची स्थिती: ग्रामीण आणि शहरी सुखदेव थोरात चित्तरंजन सेनापती
 • 13 सार्वजनिक रोजगारातील आरक्षण आणि वाटा सुखदेव थोरात आणि चित्तरंजन सेनापती
 • 14 भावी वाटचाल: नव्या सहस्रकातील दलित सुखदेव थोरात निधी सदाना सभरवाल
 • संदर्भग्रंथसूची
सुखदेव थोरात

सुखदेव थोरात हे भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) अध्यक्ष; विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष; आणि नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. याशिवाय इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ दलित स्टडीजचे माजी संचालक, आयोवा स्टेट विद्यापीठाचे अभ्यागत विषयतज्ज्ञ आणि वॉशिंग्टनमधील इंटरनॅशनल फुड पॉलिसी रिसर ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in