Loading...
Image
Image
View Back Cover

गांधीहत्येचे राजकारण: आर.एस.एस. आणि नथुराम गोडसे

 • राम पुनियानी - सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे अध्यक्ष आहेत.
 • विवेक कोरडे - परिवर्तनवादी चळवळीत गेली पस्तीस वर्षे कार्यरत आहेत.

महात्मा गांधींची हत्या ही केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वांत क्रूर घटनांमधील एक घटना आहे आणि या हत्येबाबत आजही विविध पातळ्यांवर आणि विविध माध्यमांद्वारे चर्चा होत असते. गेल्या पाच सहा वर्षांमध्ये ही चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणली जात आहे.
 
भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला गांधीहत्येसाठी दोषी मानले, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःला गांधीहत्येपासून केवळ अलिप्त करण्याचा प्रयत्न करतोय असे नाही, तर गांधीजींचे आम्हीच खरे वैचारिक वारस आहोत असे अत्यंत खुबीने लोकांसमोर मांडत आहे. हे करीत असताना महात्म्याने ज्या सत्य, अहिंसा, सर्वधर्म समभाव या मूल्यांसाठी आपले रक्त सांडले त्या मूल्यांना बाजूला सारून महात्म्याला झाडू आणि चरखा या प्रतीकांमध्ये बद्ध करून महात्म्याचे शुल्लकीकरण करीत आहे. त्याच वेळी त्यांचा खुनी नथुराम गोडसे याचे पद्धतशीर गौरवीकरण चालले आहे.
 
अशा परिस्थितीत गांधींच्या हत्येमागील कारणे, गांधीहत्येबाबत जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात येणारी असत्य-अर्धसत्य माहिती, गांधीहत्येच्या कटातील आरोपींचे जातीयवादी संघटनांशी असलेले संबंध आणि नथुरामचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध नसल्याचा संघाचा दावा, या गोष्टींचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे. 

 • प्रस्तावना
 • गांधीहत्या
 • महात्मा गांधी आणि आर.एस.एस.
 • आर.एस.एस. आणि नथुराम गोडसे
 • महात्म्याची दुसरी हत्या
 • गांधींच्या दृष्टीने आर.एस.एस.
 • गांधीजींची अहिंसा हिंदू आणि मुसलमान अशा दोघांसाठी होती
 • आर.एस.एस., फॅसिझम आणि महात्मा गांधी
 • वि.दा.सावरकर यांची दयेची याचिका (अंदमान, १९१३)
 • सावरकरवादी साहित्यिकांचे संमेलन
 • नथुरामचा रक्षाकलश
 • परिशिष्ट : दस्तावेज 1 ते 29
 • संदर्भग्रंथ सूची
राम पुनियानी

राम पुनियानी हे सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे अध्यक्ष आहेत.

विवेक कोरडे

विवेक कोरडे हे परिवर्तनवादी चळवळीत गेली पस्तीस वर्षे कार्यरत आहेत.

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in