Loading...
Image
Image
View Back Cover

भारतातील आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन

 • प्रीती दिलीप पोहेकर - राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे लोकप्रशासन विषयाच्या सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत

मानव जसजसा वैज्ञानिक गती आणि प्रगती साधतो तसतसे त्याच्या कृत्यातून तो नवनवीन आपत्तींना आमंत्रणच देत असतो आणि त्या आपत्तीतून बचावण्याच्या, सावरण्याच्या गरजेतून अधिक प्रगतीकडे जातो. आपत्ती आणि प्रगती हे मानवी जगण्याचे एक चक्र बनलेले आहे. मानवनिर्मित आपत्ती मानवी कृत्यातून/चुकातून उद्भवतात. नैसर्गिक आपत्ती ह्या नैसर्गिक घटना असल्या तरी त्यादेखील बऱ्याच अंशाने मानवी चुकातून, पर्यावरणाच्या ऱ्हासातून कोसळत असतात. आपत्ती थांबविणे फारच क्वचितदा होऊ शकते. मात्र आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न माणूस निश्चितच करू शकतो. अचूक व्यवस्थापन, नियोजन व अंमलबजावणी केल्यास आपत्तीकालीन गोंधळाची स्थिती नियंत्रणात आणता येते आणि नुकसानही कमी करता येते. आपत्ती व्यवस्थापन हे एक  शास्त्र आहे. त्यासंबंधी असलेले कायदे, धोरणे, नियोजन राबविणारी यंत्रणा म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्रशासन उदयास आलेले आहे. आपत्ती व्यवस्थापनाकरिता उभारलेली व्यापक व सक्षम यंत्रणा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन होय. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनविषयक केंद्रीय, राज्य, जिल्हा व स्थानिक यंत्रणा, त्यातील अधिकाऱ्यांची जबाबदारी, समाजाची, नागरिकांची, प्रसारमाध्यमांची, अशासकीय संस्थांची भूमिका या सर्व आयामांचा अभ्यास ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. आपत्ती काळात तसेच आपत्ती पूर्व व उत्तर काळात कोणती खबरदारी घ्यावी हेदेखील यात नमूद केलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेले प्रयत्न व त्यांची राबवणूक यांचा आढावा घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन हे केवळ तत्त्वज्ञान नसून ती एक कृती आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे कृतीप्रवण शास्त्र आहे.. आपत्ती व्यवस्थापनाचा संकल्पनात्मक, सैद्धान्तिक, व व्यावहारिक अशा सगळ्याच पातळ्यांवर अभ्यास करणारे मराठी भाषेतील पहिले व एकमेव पुस्तक आहे.

 

 • प्रस्तावना
 • मनोगत
 • आपत्ती: संकल्पना
 • आपत्ती व्यवस्थापन
 • आपत्ती व्यवस्थापनाचे आंतरराष्ट्रीय संदर्भ
 • भारतातील आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यंत्रणा
 • भारतातील आपत्ती व्यवस्थापन प्रशासन : त्रिस्तरीय यंत्रणा
 • आपत्ती व्यवस्थापनातील प्रशासकीय पदे
 • आपत्ती व्यवस्थापन : विविध घटक
 • आपत्ती क्षेत्र व्यवस्थापन
 • परिशिष्ट १
 • परिशिष्ट २
 • संदर्भ सूची
प्रीती दिलीप पोहेकर

प्रीती दिलीप पोहेकर, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे लोकप्रशासन विषयाच्या सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांना अध्यापनाचा १८ वर्षांचा अनुभव आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झालेल्या आपत्ती प्रशासन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची समन्वयक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी ८ आंतरराष्ट्रीय (कॅलिफोर्निया, हाँगक ... अधिक वाचा

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in