Loading...
Sharlene

शार्लीन नॅगी हेस-बिबर

प्राध्यापिका, बॉस्टन कॉलेज

शार्लिन नॅगी हेस-बिबर, पीएचडी, चेस्टनट हिल, मॅसॅच्युसेट्स येथील बॉस्टन कॉलेजमध्ये समाजशास्त्राची प्राध्यापिका आणि स्त्री आणि लिंग अभ्यासक्रमाची संचालिका आहे. सामाजिक सांस्कृतिक घटकांच्या स्त्रियांच्या शरीर प्रतिमेवरील प्रभावावर तिचे खूप लिखाण प्रसिद्ध झाले आहे, ज्यात तिचे पुस्तक अॅम आय थिन इनफ यट? द कल्ट ऑफ थिननेस अँड कमर्शियलायजेशन ऑफ आयडेंटिटी/मी अजून पुरेशी बारीक झाले का? बारीक होण्याचा कल आणि स्वतःच्या ओळखीचे बाजारीकरण (ऑक्सफर्ड, 1996), याचा समावेश आहे. या पुस्तकाची चॉइस मासिकाचे 1996 च्या सर्वोत्तम शैक्षणिक पुस्तकांपैकी एक म्हणून निवड झाली होती. तिने कल्ट ऑफ थिननेस (ऑक्सफर्ड, 2007) हे पुस्तक प्रकाशित केले आणि ती अॅप्रोचेस टू क्वालिटेटिव्ह रिसर्च: अ रीडर ऑन थियरी अँड प्रॅक्टिस (ऑक्सफर्ड, 2004) आणि इमर्जंट मेथड्स इन सोशल रिसर्च (सेज, 2006)ची सह-संपादिका आहे. ती हँडबुक ऑफ फेमिनिस्ट रिसर्च: थियरी अँड प्रॅक्टिस (दुसरी आवृत्ती) (सेज, 2012),ची संपादिका आहे, हे पुस्तक अमेरिकन एज्युकेशन स्टडीज असोसिएशनकडून क्रिटिक्स चॉइस अवॉर्डसाठी (टीकाकारांची निवड) निवडले गेले होते. तसेच ते चॉइस मासिकाचे 2007चे उत्तम शैक्षणिक पुस्तक म्हणून निवडले गेले. ती फेमिनिस्ट रिसर्च प्रॅक्टिसचीदेखील संपादिका आहे (सेज, 2014). मिश्र पद्धतींचे संशोधन या विषयावर तिची खूप पुस्तके आहेत आणि तिचे लेखन क्वालिटेटिव्ह हेल्थ रिसर्च (QHR), क्वालिटेटिव्ह इंक्वायरी (QI) आणि जर्नल ऑफ मिक्स्ड मेथड्स रिसर्च (JMMR) यामध्ये प्रकाशित होते. ती JMMRची सहसंपादिका होती. मिक्स्ड मेथड्स रिसर्च: मर्जिंग थियरी विथ प्रॅक्टिस (गील्फोर्ड, 2010)ची ती लेखिका आहे. तिचे सर्वांत अलीकडचे सहसंपादन केलेले पुस्तक द ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ मल्टीमेथड अँड मिक्स्ड मेथड्स रिसर्च इन्क्वायरी (ऑक्सफर्ड, 2015) हे आहे. तिला अलीकडेच अल्फा सिग्मा नु या सोसायटीच्या वतीने एका प्रबंधासाठी गौरवण्यात आले. ‘वेटिंग फॉर कॅन्सर टू कमः विमेन्स एक्सपिरियन्सेस विथ जेनेटिक टेस्टिंग अँड मेडिकल डिसिजन मेकिंग फॉर ब्रेस्ट अँड ओव्हरियन कॅन्सर’ (युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन प्रेस, 2014) या प्रबंधाला हे पारितोषिक मिळाले. ती हायपर रिसर्च या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमची सहनिर्माती आहे, हा गुणात्मक आणि मिश्र पद्धतीच्या डेटाचे विश्लेषण करणारा कॉम्प्युटर प्रोग्रॅम आहे. प्रतिलेखनाचे नवे साधन हायपर ट्रान्स्क्राइबची सह-निर्मातीदेखील आहे. www.researchware.com या संकेतस्थळावर या प्रोग्रॅम्सचे पूर्ण प्रयोग उपलब्ध आहेत. यावर या दोन्ही प्रोग्रॅम्सच्या अध्यापनाच्या विनामूल्य आवृत्ती उपलब्ध आहेत.