Loading...

व्हर्जिनिया ब्राऊन

ऑकलंड विद्यापीठ, न्यूझीलंड

व्हर्जिनिया ब्राऊन या न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ऑकलंड विद्यापीठात मानसशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्या स्त्रीवादी आणि टीकात्मक मानसशास्त्रज्ञ आहेत. लिंगवाद, शरीर, लिंग/लैंगिकता आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये त्यांनी संशोधन केले आहे. बहुलैंगिकता, लैंगिक स्वास्थ्य, योनीमार्गाचा कर्करोग व त्यावरील प्रतिबंधक उपाय/धोरण लैंगिकता आणि उच्च शिक्षण, स्त्रियांचे त्यांच्या शरीराबाबतचे अर्थ व अनुभव आणि स्त्रियांच्या जननेन्द्रियाच्या शस्त्रक्रिया – अशा विषयांवरील प्रकल्पांवर काम केले. सध्या मार्स्डेनच्या आर्थिक मदतीने केल्या जाणाऱ्या पोर्नोग्राफीसंबंधित प्रकल्पात त्या व्यग्र आहेत. शैक्षणिक काम आणि सामाजिक चळवळ यातील संबंधात त्यांना रुची आहे. गुणात्मक संशोधनात त्यांना विशेष रुची आहे, व व्हिक्टोरिया क्लार्कबरोबर तिने विषयानुसार विश्लेषणाबाबत सैद्धांतिक दृष्ट्यालवचिक अशी पद्धत विकसित केली आहे. सध्याती फेमिनिझम ऍन्डसायकॉलॉजी या मासिकाचे संपादन करते आहे (निकोला गॅवी बरोबर)