Loading...

आन्नेके मॅथिज्सेन

सहयोगी प्राध्यापक, इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर सोशल सायन्स थिअरी अँड मेथडॉलॉजी (आयसीएस)

आन्नेके मॅथिज्सेन यांनी त्यांची कारकीर्द वैद्यकीय विश्लेषक म्हणून सुरू केली. त्या स्वतःच्या अभ्यासाच्या कालावधीत आणि नंतर रॅडबाऊड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर देखील संख्याशास्त्राचे अध्यापन करीत होत्या. 2008 पासून, त्या रॅडबाऊड युनिवर्सिटीच्या स्ट्रॅटजी अँड डेव्हलपमेंट विभागात धोरणविषयक सल्लागार ⁄ संस्थात्मक संशोधक म्हणून कार्यरत आहेत. धोरणविषयक सल्लागार म्हणून काम करताना, त्या बोर्ड आणि व्यवस्थापन विद्याशाखांना शिक्षण आणि संशोधन विषयक माहिती देतात. त्या सर्व डच विद्यापीठांमधील धोरणविषयक सल्लागार असलेल्या डच असोसिएशन फॉर इन्स्टिट्यूशनल रिसर्चर्स या संस्थेच्या चिटणीस म्हणून देखील काम करतात. त्यांना मॅनफ्रेड यांच्या अगदी उलट, इटलीतील पर्वतांमध्ये सायकल चालवायला आवडते. त्यांनी नेदरलंड्समधील रॅडबाऊड युनिवर्सिटी, नायमेगन येथून शैक्षणिक विज्ञान या विषयात MSc केले आहे.