Loading...
Nilanjan

नीलांजन बानीक

सहयोगी प्राध्यापक, महिंद्रा एकोले सेन्ट्राले, हैदराबाद

नीलांजन बानीक यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात एमए पदवी आणि अमेरिकेतील युटा स्टेट युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, मार्केट संरचना आणि विकास अर्थशास्त्राच्या कालपरत्वे विश्लेषणावर त्यांचे संशोधन आधारित आहे. ऑस्ट्रेलियन सरकारचा परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभाग; लॅफर असोसिएट्स, अमेरिका; वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार; विकसनशील देशांची संशोधन आणि माहिती संस्था (आरआयएस), नवी दिल्ली; आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध आणि संशोधनविषयक भारतीय परिषद, नवी दिल्ली; सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च, यूके; एशियन डेव्हलपमेंट बँक इन्स्टिट्युट, टोकियो; एशियन डेव्हलपमेंट बँक, मनिला; साउथ एशिया नेटवर्क ऑफ इकॉनॉमिक रिसर्च इन्स्टिट्युट (एसएएनईआयई); यूएनईएससीएपी-एआरटीनेट, थायलंड; जागतिक व्यापर संघटना, जिनिव्हा या संस्थांच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव आहे. मध्यंतरी ते इन्स्टिट्युट फॉर फायनॅन्शियल मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएफएमआर), चेन्नई येथे प्राध्यापक आणि कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते महिंद्रा इकोले सेन्ट्राले येथे कार्यरत आहेत आणि कट्स इंटरनॅशनल आणि केपीएमजी, इंडिया यांचे सल्लागार आहेत. ते युटा स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका; डरहॅम विद्यापीठ, यूके; ग्रीनलँड विद्यापीठ, नूक; इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (इंदूर, रोहतक आणि रांची); मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स; रिझर्व्ह बँक स्टाफ कॉलेज, चेन्नई येथे विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि आयसीआयसीआय बँक येथे नियुक्त झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे.