Loading...
Robin

रॉबिन बॅनर्जी

चार्टर्ड अकाऊंटंट, किंमत आणि व्यवस्थापन खाते, कंपनी सचिव

रॉबिन बॅनर्जी हे एक वरिष्ठ व्यावसायिक कार्यकारी अधिकारी असून गेल्या ३५ वर्षात विविध २० देशांमधील अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. ते एक चार्टर्ड अकौटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट तसेच कंपनी सेक्रेटरी असून कॉमर्स शाखेचे द्विपदवीधर आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर मधे निर्यात विभागाचे आणि एकत्रिकरण व ताबा घेणे या विभागाचे जनरल मॅनेजर म्हणून तसेच इतरही अनेक पदांवर काम केले. त्यांनी नंतर जर्मनीला प्रयाण केले व आर्सेनल मित्तलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून तसेच त्यांच्या जर्मनीमधील कामकाजाचे CFO म्हणून काम बघितले. जर्मनीमध्ये पाच वर्ष काम केल्यानंतर रॉबिन बॅनर्जी भारतामध्ये परतले आणि थॉमस कूक मधे कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून रूजू झाले. नंतर त्यांनी एस्सार स्टीलमधे कंपनीचे CFO म्हणून आणि त्यांच्या ग्लोबल बोर्डाचे सदस्य म्हणून काम बघितले. नंतर ते सुझलॉन इंडियामध्ये त्यांच्या ग्रुपचे CEO आणि त्यांच्या ऑस्ट्रेलिया, चीन, चिली, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेमधील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या बोर्डाचे सदस्य म्हणून काम बघितले. सध्या ते एका मोठ्या उत्पादन कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. रॉबिन बॅनर्जी यांना अनेक पारितोषके मिळालेली असून ‘बिझिनेस टुडे’ने भारतामधील सर्वोत्तम CFO या पारितोषिकासाठी त्यांना नामांकन दिले होते, तसेच २०१० मधे CFO -१००साठी मानांकन मिळाले होते. २०१२ मधे CFO-इंडिया मॅगझिनने, DNA ने कॉर्पोरेट लीडर इन इंडिया या पारितोषिकाने गौरविले आणि अशाच प्रकारची अनेक परितोषिके त्यांना मिळाली आहे. रॉबिन बॅनर्जी यांनी ‘अप्रत्यक्ष कर’ या विषयावर तीन पुस्तकं लिहिली असून त्यापैकी ‘मॉडव्हॅट’ या पुस्तकाची तर दहावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. व्यवसाय व्यवस्थापन आणि वित्तपुरवठ्याशी संबंधित विषयाचे ते एक नामांकित आणि ख्यातनाम वक्ते समजले जातात आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास वर्ग आणि परिषदांमध्ये त्यांचे लेख वाचण्यात आले आहेत. अनेक नियतकालिके, मासिके आणि वेबसाइट्ससाठी ते वेळोवेळी लेखन करतात.