Loading...

बी. एन. घोष

प्राध्यापक, लीड्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अण्ड टेक्नॉलॉजी, युके

 बी. एन. घोष, पीएच.डी. (भारत), पीएच.डी. (ऑस्ट्रेलिया), एमसीआयएम (यु.के), जीएफसीआर (हार्वर्ड), हे लीड्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलोजी, यु. के. येथे अभ्यागत प्राध्यापक होते. इस्टर्न मेडिटेरेनियन युनिव्हर्सिटी, सायप्रस, युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स, पेनांग (मलेशिया), आणि झिजियांग गोंगशांग युनिव्हर्सिटी, चायना येथेदेखील ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी ते इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी आणि KIMB, केरळ सरकार (पुन्नाप्रा, केरळ) येथे संचालक होते. त्यांनी अनेक व्यावसायिक नियतकालिकांमध्ये विस्तृत लेखन केले आहे आणि यु.के., इटली, चीन, उत्तर आफ्रिका, भारत आणि इराण यांसारख्या अनेक देशांतील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी झाले होते. त्यांचे संशोधनाधारित लेखन भारत, अमेरिका, यु.के., कॅनडा, इटली, मलेशिया, सिंगापोर, बांगला देश, नेदरलँड, कोरिया आणि फिलिपाइन्स या देशांत प्रकाशित झाले आहे. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन, संपादन आणि सह-लेखन केले आहे. हे लेखन सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले आहे. संराविका, मलेशिया शासन यांसारख्या अनेक संस्थांसाठी त्यांनी अल्पकालावधीसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. जर्नल ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट चे ते मुख्य संपादक होते. शैक्षणिक गुणवत्तेसाठी देण्यात येणाऱ्या एमेराल्ड पुरस्काराने सन २००६ साली घोष यांना गौरविण्यात आले.